Saturday, 16 April 2016

एकटेपण कुठे असतं एकटं

एकांत  असतो सुंदर, निरपेक्ष , अलिप्त ?
हे सांगायला कुणी लागतंच ना…. 

निरभ्र आकाश एकटंं किती सोसणारं
धरतीच्या भेटीसाठी ते वाकतचं ना

सरिता  एकटीच असते उंडारत
सागराच्या मिलनाची आस तिला लागतेच ना …

आत्ममग्न  वाळवंट स्वतःलाच कुशीत घेऊन झोपतं
वाऱ्याची  झुळूक   त्याला वेडं करतेच ना … 

एकटेपण कुठे असतं एकटं
त्याला मनाची अविरत   सोबत लागतेच ना ….



No comments:

Post a Comment