Friday, 6 May 2016

"हा शेखर खोसला कोण आहे ?"

   


        "हा शेखर खोसला कोण आहे ?"  हे एक वेगळ्या धाटणीचे रहस्यमय नाटक आहे .  वेगवेगळ्या ब्लॉक्स मधून साकारणारे तरीही विशिष्ठ कथासूत्र न मांडणारे असे हे नाट्य आहे . किंबहुना विस्कळीतपणा नाटकाचे रहस्य अधिक गहिरे करतो . सत्य आणि आभास यातलं द्वंद्व , गुंतागुंत इतकी वेगवान आहे की ,  प्रेक्षकांना विचार करण्यास सवड मिळत नाही  . शेखर खोसला ही एक प्रवृत्ती आहे . प्रत्येकात आढळणारी . खरतर आपण आपल स्वप्न दुसऱ्याच्या आधाराने जगण्याचा प्रयत्न करत असतो , लादत असतो . अस करताना एक निरागसतेचा बुरखा पांघरायला आपण विसरत नाही . ही दांभिकता नायिकेला खटकते आहे . 

      नायिकेच्या समोर  खऱ्या जगातील  शेखर खोसलाचे चित्र एक लेखक जाणीवपूर्वक व नकारात्मकतेने उभे करतो . त्याला त्याचा वैयक्तिक हिशेब चुकवायचा असतो .  शेखर खोसलाचे व्यक्तीमत्व नायिकेचे जग व्यापून टाकते . तिचा इतका ताबा घेते की , त्याच्याबद्दल निर्माण झालेली नकारात्मकता तिला त्याचा खून करण्यास भाग पाडते . ती अस का करते किंवा तिच्या हातून अस का घडतं यासाठी नाटक पहाव लागेल . 

No comments:

Post a Comment