Monday, 16 January 2017

माझी आई तिचा बाप

       


     


         मोहन जोशी, स्मिता जयकर अशी मातब्बर मंडळी असलेलं या नाटकाने कुतूहल न जागवावं तर नवल . मुलांना दत्तक घेणे ही संकल्पना समाजात आता बऱ्यापैकी  रुजली आहे . परंतु चक्क आई -वडिलांना दत्तक घेणे ही संकल्पना मात्र नवीन आहे . ज्या मुलांना आई - बापाचे प्रेमच  मिळालेले नाही , अश्या मुलांना आपल्या आपल्या मुलांसाठी प्रेम ,संस्कार मिळावे म्हणून आई -बाबा असावे असं वाटलं तर त्यात काय वावगं आहे ? 

         नाटकातील जोडपं अनाथ आहे . लहानपणापासून आई -बापाच्या प्रेमाला पारखे झालेलं . ज्या बद्री -काकांनी त्यांचा सांभाळ केलेला असतो त्यांनाच ते दत्तक बाबा म्हणून विचारतात . परंतु ते साफ नकार देतात. मग शोध सुरु होतो  आई -बाबांचा .  तो आई शोधून आणतो . ती असते सात्विक, धार्मिक , कर्मठ , शाकाहारी . तिच्या अटी असतात राहण्यासाठी , त्याप्रमाणे तिला अन्य कुणीही पुरुष माणूस घरात चालणार नसतो. दारू, मांसाहार , मोठ्याने बोलणं व्यर्ज्य . ती सरप्राईस देण्याच्या नादात बाबा घेऊन येते . त्यांचा प्रवेशच मायझया या शब्दाने सुरु होतो . म्हणजे दोन विरुद्ध स्वभावाची माणसं एकत्र आल्यावर जी धमाल उडते ती प्रत्यक्ष रंगमंचावर पाहण्यात मजा आहे. 

          नाटकाचा शेवट अनपेक्षित आहे . एक हलकंफुलकं , आनंदी करणार नाटक जरूर पहा . 


No comments:

Post a Comment