या नाटकाची कथा वाचली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर जी पात्रं आली ती म्हणजे मंगेश कदम, लीना भागवत. यांच रंगभूमीवरील रासायनिक नाट्यसमीकरण अफलातून आहे. विक्रम गोखले यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे "के दिल अभी भरा नही" मध्ये काम करण्याच सोडल्यानंतर एका नवीन स्वरुपात हे नाटक रंगभूमीवर पुन्हा आल आहे.
मंगेश कदम यांच्या चेहऱ्यावर असलेला भाबडेपणा अन लीना
भागवत यांचा नैसर्गिक अवखळपणा या अफलातून समिश्रणातून नाटकाच गंभीर कथाबीज हसतखेळत मनात
रुजू लागतं. आयुष्याचे भावनात्मक कप्पे
प्रेक्षकांवर कोणतीही ओझ न लादता उलगडू
लागतात.
अरुण नगरकर एक व्यावसायिक, वंदना नगरकर गृहिणी. व्यवसायाच्या व्यस्ततेत पत्नीकडे लक्ष द्यायला
वेळ मिळाला नाही. याची जाणिव त्यांना
असते. आपली मुलगी राधिकाला ते निवृत्त
होणार असल्याच व पत्नीला ते सरप्राईज देणार असल्याच सांगतात. अरुण नगरकरांनी निवृत्तीनंतर पत्नीला गृहित
धरुन अनेक प्लॅन केलेले असतात. परंतु
पत्नीच त्यांना सरप्राईज देते, ते पौराहित्य कोर्सच सर्टिफिकेट दाखवून. तिला स्वत:ची ओळख हवी असते. चूल आणि मूल या पारंपारिक ओळखीशिवाय तिला वेगळी ओळख हवी असते , तिचं स्वतःच असं विश्व , अस्तिव हवं असतं .
पुरुषी मानसिकतेमुळे अरुण नगरकारांना तिचा निर्णय पटत
नाही. परंतु वंदना आपल्या निर्णयावर ठाम
असते. यातुन सुरुवात होते मतभेदांना. मतभेद होताना भूतकाळातील घटना उगाळल्या जाऊ
लागतात. भूतकाळातील गैरसमजातून निर्माण
झालेली दरी, वादविवाद यातून त्याचं नातं तुटणार का असे प्रश्न पडायला लागतात. त्यांच्यातले ताणतणाव विकोपाला जातात का? आयुष्यभर आपण एकत्र राहतो मात्र भावनात्मक गुंतवणुकीची
बीजं काळाच्या तडाख्यात पेरायला विसरतो.
उतारवयातील नात्यांची घट्ट बीजं भूतकाळात विणलेल्या भावनात्मक धाग्यांवर
अधिक बळकट होतात , याचा जणू विसर पडतो आपल्याला . अशावेळी सिंगापूरमधील त्यांचा मुलगा आईला त्याच्याकडे
बोलावतो. आई जाते का?
वंदना नेमका
काय निर्णय घेते. अरुण अन तिच्या नात्याला नेमकं वळण मिळत , यासाठी हे नाटक जरूर
पहा. नात्याची थोडी पेरणी किती आवश्यक आहे? याची तीव्रतेने जाणीव होईल . हसत खेळत
डोळयांचा कडा ओलं करणार सुंदर नाटक.
No comments:
Post a Comment