Friday, 20 January 2017

" मरुभूमीतील मृदगंध "

              




        दूरवर पसलेला वाळूचा सागर.  नजर पोहचू शकेल तेथे दिसते आहे ती फक्त वाळू.  या वातावरणातून निर्माण झालेला पुराणमतवादी संस्कृतीचा एक देश.  जेथे प्रागतिक संस्कृतीची किरणे अजून पोहचलेली नाहीत.  शाळा, शिक्षण म्हंजी कायअसा यांना प्रश्न यांना नसून , आजच्या जगण्याचे काय हा  नेहमी भेडसावत असतो .भ्रांत असते फक्त आजच्या जगण्याची.कल्पना करा अशा वातावरणात आपली मुल किती प्रगती करु शकतील.  प्रगतीला सुयोग्य वातावरणाची आवश्यकता असते, अस आपल म्हणण त्यासाठी मुलांना हव्या त्या सुविधा पुरविल्या जातात, म्हणून प्रत्येक मूल जागतिक किर्तीला पाहेचत काफक्त वातावरण पुरेस नाही.  संधी नेहमी उपलब्ध असतात.  गरज असते एका जबरदस्त आंतरीक उर्मीची.  ती उर्मी, तळमळ कशी चेतवायचीयावर सध्या तरी उत्तर नाही.  परंतु पूर्णपणे भकास, उदास वातावरणातून जिने आपल्या आयुष्यात  रंगबिरंगी कारंजे फुलविले त्या वारिस  म्हणजे डेझर्ट फ्लॉवरने  पेरिलीच्या कॅलेंडरवर झळकण्याचा मान मिळविला.  त्यात काय एवढ अस वाटेल.  पेरिलीच्या कॅलेंडवर झळकणे इतकी सोपी गोष्ट नाही आज तुम्ही व्यावसायिक मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेऊनही त्या कॅलेंडरवर सहजपणे झळकू शकत नाही.  काय होत या निरक्षर मुलीत, तिच्यात आंतरिक उर्मी कशी उत्पन्न झाली?.  

         सोमालियातील भटक्या जमातीत जन्म झालेली एक निरक्षर मुलगी ते यशस्वी मॉडेल , लेखिका , समाजसेविका , विशेष राजदूत हा प्रवास थक्क करणारा आहे . तिचा जन्म १९६५ साली सोमालियात एका छोट्या प्रदेशात झाला . वयाच्या १३ व्या  वर्षी एका वयस्क इसमाशी ठरलेल्या विवाहातून सुटका मिळविण्यासाठी ती मोगादिशू या छोट्या शहरात  पळाली . तिथे तिची भेट काही वर्षांपूर्वी घरातून पळालेल्या तिच्या मोठ्या बहिणीशी झाली  . परिस्थिती नात्यांनाही वाकवते . तिची बहीण अमान आता पूर्वीची अमान राहिली नव्हती . एक व्यवहारी स्त्री झाली होती . इथे वारिसला  अक्षरशः घरकाम ,  बाळ सांभाळणे अशी कामे करावी लागली .   वारीसाचा हा प्रवास खडतर होता . इथे तिने घरकाम, बांधकाम मजूर जे मिळेल काम केले . तिथून तिचा प्रवास सुरु झाला लंडनला . तिच्या मावशीकडे . इथे तिच्या नित्यक्रमात फरक पडला नव्हता . परंतु , एका वेगळ्या विश्वाची तिला ओळख झाली . इथेच ती इंग्रजी शिकली . वाळवंटच्या  खाणीतील या हिऱ्याची पारख फोटोग्राफर टेरेंन्स डोनोवोन याने केली नसती , तर तिच्यातले  सौंदर्य कदाचित मेंढ्या राखण्यात,  वाळूच्या समुद्रात मातीमोल झाले असते . त्याने तिच्यातली  सुप्त सुंदरता नेमकी टिपली आणि जगाला तिची ओळख करून दिली . त्यानंतर तिने मागे वळून पहिले नाही . पेरिलीच्या पेरिलीच्या कॅलेंडरवर झळकणे , जेम्स बॉण्डच्या The living day lights या चित्रपटात भूमिका मिळणे , अशी एका पाठोपाठ एक यशाची शिखरे ती पादाक्रांत करत होती .

     मेरी क्लेअर या एका महिला मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीनंतर तिच्या बालपणीच्या यातनांची कथा जगासमोर आली . वारिसने नंतर ही प्रथा मोडीत काढण्याच्या कार्याला वाहून घेतले .स्त्री -सुंता सारखी भयाण प्रथा विसाव्या शतकातही ज्या प्रदेशात सुरु होती , त्याभागात वाढलेल्या वारिसचे बालपण कसे सेल ? या भयाण प्रथेला वारिसही  बळी पडली होती . या प्रथेमागची पार्श्वभूमी आणि  प्रथा याबद्दल वाचून अंगावर सरसरून काटा  उभा राहतो . मन विषण्ण होते. भारतातील लौसा , देवदासी अशा काही प्रथा  स्त्रीच्या हतबलतेला , खच्चीकरणाला कारणीभूत ठरल्या होत्या . आपले अनुभव तिने पुस्तकरूपाने जगासमोर आणले . " डेझर्ट फ्लॉवर " ह्या तिच्या पुस्तकाची अनेक भाषांत भाषांतर झाली . तिने अनेक पुस्तकांतून आपले अनुभव लेखणीबद्ध केले . एक निरक्षर मुलगी ते साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी नोंद घ्यावी , हि गरुडभरारी नेत्रदीपक आहे .

          तिचे बालपण ते सुपर मॉडेल आणि पुढचा प्रवास डॉक्टर मुदरंगी यांनी सूक्ष्म तपशीलांसह " मरुभूमीतील मृदगंध " या पुस्तकात प्रवाहीपणे  चितारला आहे .  यशाची उत्तुंग शिखरं पादाक्रांत करायला विशेष प्रशिक्षण लागतंच  असं नाही , देवाने दिलेली आपल्यातील प्रतिभा आपणाचं फुलवायची आहे . त्यासाठी तीव्र आंतरिक उर्मी आवश्यक  असते , वारिसचे  पुस्तक वाचनात आलं नसतं तर  हे सत्य उमगलं नसतं . 

No comments:

Post a Comment