Saturday, 21 January 2017

शोधणं



सकाळी उठलो की  चाचपडतो ,
आपलाच चेहरा , उष्ण श्वास अस्तित्वासाठी

केवळ असणं हेच अस्तित्व की ,
जगणं   त्या पलीकडलं काही

त्याचं जगणं , माझं जगणं
जगण्यात असं  काय  वेगळं आहे ?

असे अनेक प्रश्न भिडत असतात
अस्तित्वाचा मार्ग शोधत असतात .

हळुवार उलगडू लागतं  जगणं  ,
उमजू लागतं शोधणं

हेचं तर अस्तित्व आहे
माझं , जगण्याचं

जगण्याकडे वेगळ्या
परिप्रेष्यातून पाहण्याचं 

No comments:

Post a Comment