वृध्दांच्या समस्या असू शकतात. प्रत्येकाच एक स्वतंत्र अस्तित्व, जगण्याचा परिघ असतो, ही संकल्पना अद्याप आपल्या समाजात रुजलेली रुजलेली नाही. भावनिक आधाराने एकमेकात गुंतलेल्या नात्यांमुळे अपेक्षांच ओझ वाढू लागतं . .भावना, नाती याच्या मायाजालात गुंतून अवास्तव अपेक्षांच ओझ वाढत जात. भावनिक गुंतवणूक आवश्यक असली तरी त्याचा कडेलोट झाल्यास उद्रेक होऊ शकतो.
भारतात वृद्धांची संख्या जवळजवळ 81 milion इतकी आहे . वृद्धांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक दुसरा येतो . कुटुंबसोबत राहणाऱ्या ४० टक्के वृद्धांना विविध समस्येंना तोंड द्यावे लागते . यात प्रामुख्याने त्यांना घर विकण्यास दबाब आणणे , आर्थिक दुर्लक्ष करून त्यांचे अवलंबवित्व वाढविणे , अशा काही समस्या आहेत . तब्येत , भीती, विवंचना , आत्मप्रतिष्ठा अशा अन्य समस्याबरॊबरच मानसिक समस्याही आहेत .
मेन्टेनन्स ऑफ पॅरेण्ट अक्ट नुसार पालकांची काळजी घेण्यास मुलांना मॅजिस्ट्रेट बाध्य करू शकतात . डोमेस्टिक व्हायोलेन्स अक्ट नुसार पालकांचा छळ करणाऱ्या मुलांवर कारवाई करता येते . याची अनेकांना माहिती नसते किंवा सामाजिक प्रतिष्ठेपायी असे पाऊल उचलले जात नाही .
मुलांना जन्म दिला म्हणून त्यांनी कर्तव्य भावनेने पालकांकडे पाहिले पाहिजे. हे संस्कार लहाणपणापासून बिंबवले जात असल्यामुळे पालक कायम आशाळभूत असतात . त्यात त्यांचा दोष नाही . अच्युत गोडबोले यांच्या एका पुस्तकात वाचले होते की, बाळाची संमत्ती घेण्याची कोणतीही सोय नाही. ते तुम्हाला विचारून या जगात आले नव्हते . अशा वेळी संपूर्ण जबाबदारी पालंकांकडे येते. पालक पालकांनी अवास्तव अपेक्षा बदलून आयुष्याचे नियोजन केले तर त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही.
"आनंदयात्री" अशा अपेक्षाभंग झालेल्या
वृध्दांची कहाणी आहे. "नटसम्राट" मधील म्हाताऱ्याची कहाणी जशी प्रातिनिधिक आहे , तसे आजच्या वृद्धांच्या दुःखाचे कंगोरे वेगळे असले तरी हृदयातील दुःख सारखंच आहे . प्रत्येकाच्या
व्यथेला सामाईक पदर आहे. त्यांची कहाणी
वेगवेगळया माध्यमातून उलगडत जाते . यातले मेजर
मात्र कर्तव्य भावनेने इथे आलेले असतात. वृद्धाश्रमाचे मॅनेजर
तर आई वडिलांची सेवा करण्यसाठी घरदार सोडतात, पत्नीलाही घटस्फोट देतात . असे अपवाद सोडले तर सर्वांच्या
दु:खाला अपेक्षाभंगाची झालर आहे. स्वतःच्या आशाआकांक्षाना तिलांजली देऊन मुलांसाठी छोट्या घरातील संसार नेटाने चालविणाऱ्या पालकांना घराबाहेर काढले जाणे हे आजच्या व्यावहारिक जगातील सर्वसाधारण उदाहरण आहे. समाजात दिसणाऱ्या परंतु जास्त चर्चिल्या न जाणाऱ्या या अनुभवांना लेखकाने नेमस्तपणे टिपले आहे . एक मुलगी
तेथे वृध्दांच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी आलेली असते. भूतकाळातल्या जखमा पुन्हा ताज्या होऊ नयेत
म्हणून काही वृध्द तिला विरोध करतात. तिचा
नेमका उद्देश काय असतो ? सर्वांची व्यथा उलगडताना नाटक वेगवेगळी वळणे घेत एका वेगळ्याच टप्प्यावर पोहचते . काय आहे हा टप्पा ? तसेच वृद्धांच्या समस्यांना आपुलकीने समजून घेण्यासाठी हे नाटक जरूर पहा .
प्रत्येकाची कहाणी उलगडताना नेपथ्याचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. संगीत, प्रकाश योजना, विषयाचा योग्य मूड सांभाळते.ना कशाची , ना उद्याची, आम्हास काळजी. आम्ही आनंदयात्री या ओळी वृद्धांनी स्वीकारलेल्या सहजीवनाची अपिरिहार्यता अधोरेखित करतात . सर्व कलाकारांचा अभिनय उत्कट आंतरिक तळमळीतून झ्याल्यामुळे वृध्दांची वेदना परिणामकारकरित्या व्यक्त होते.
प्रत्येकाची कहाणी उलगडताना नेपथ्याचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. संगीत, प्रकाश योजना, विषयाचा योग्य मूड सांभाळते.ना कशाची , ना उद्याची, आम्हास काळजी. आम्ही आनंदयात्री या ओळी वृद्धांनी स्वीकारलेल्या सहजीवनाची अपिरिहार्यता अधोरेखित करतात . सर्व कलाकारांचा अभिनय उत्कट आंतरिक तळमळीतून झ्याल्यामुळे वृध्दांची वेदना परिणामकारकरित्या व्यक्त होते.
प्रायोगिक रंगभूमीवरील हे नाटक
व्यवसायिक रंगभूमीवर आणणे धाडसाचे असले तरी, दुर्लक्षित विषयास त्यामुळे वाचा फुटली, हे लक्षणीय आहे . आज रंगभूमीवर येणारी नाटके मेलोड्रामा, कॉमेडी,
रहस्य अशी केवळ मनोरंजनात्मक विषयावर आधारित असल्यामुळे सामाजिक विषयांकडे
दुर्लक्ष होते. अपेक्षा करण्यापेक्षा
एकमेकांच्या सोबतीने आनंदयात्री बनून
राहिल्यास , आयुष्य सुसह्य होईल याची खोल जाणीव सर्वांना करुन देऊन एक छान संदेश हे
नाटक अंर्तमनावर कोरते. मंगेश पाडगावकर यांच्या "आनंदयात्री" या कवितेतील काही ओळी आठवू लागतात .
हासत दुःखाचा
केला मी स्वीकार
वर्षिले चांदणे
पिऊन अंधार
प्रकाशाचे गाणे
अवसेच्या राती
आनंदयात्री मी
आनंदयात्री
हासत दुःखाचा
केला मी स्वीकार
वर्षिले चांदणे
पिऊन अंधार
प्रकाशाचे गाणे
अवसेच्या राती
आनंदयात्री मी
आनंदयात्री
No comments:
Post a Comment