Monday, 30 January 2017

९ कोटी ५७ लाख

                  




       
सर्कीट हाऊस या नाटकानंतर फार्सच्या अंगाने जाणारे, बऱ्याच कालावधीनंतर आलेले ९ कोटी ५७ लाख हे नवे नाटक आहे.  फार्स या प्रकारात कथानकाला महत्व नसते.  एका घटनेतून दुसऱ्या घटनेची विनोदी मालिका सुरु होते. त्याचा वेग आणि प्रवाहीपणा यात प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे कौशल्यपूर्ण काम आहे .  

       या नाटकाचे कथानक छोटेसेच आहे.पुण्याच्या टॅक्सी स्टँन्डवर, टॅक्सीमध्ये सहप्रवाशाच्या आणि दिलीपच्या बॅगेची अदलाबदल होते.  त्याला मिळालेल्या बॅगेत ९ कोटी ५७ लाखाच्या जुन्या नोटा सापडतात.  जुन्या नोटांचा संदर्भ आल्यामुळे नुकत्याच जुन्या नोटांमुळे घडलेल्या घटनांचा समावेश असेल  वाटले होते. परंतु जुन्या नोटांचा फार संदर्भ न घेता नाटक पुढे सरकते .  अचानक सापडलेल्या संपत्तीमुळे दिलीप परदेशात जाण्याची स्वप्ने आपल्या पत्नीसोबत रंगवू  लागतो.  त्यानंतर त्याचा मित्र व त्याची पत्नी , खाजगी डिटेक्टीव, टॅक्सी ड्रायवर, इन्स्पेक्टर अशी वेगवेगळी पात्रं रंगमंचावर येतात.  त्यातून पुढील घटनांची मालिका सुरु होते . या घटनांमधून पुढील गमती -जमती  सुरु होतात . नाटकातील विनोद अतिशयोक्तीपूर्ण आहेत.  साधारणत: फार्सच्या अंगाने जाणाऱ्या कॉमेडीत अशा विनोदांची व घटनांची खरपूस पेरणी केलेली असते. यातून निर्भेळ आनंद मिळतो का ?  दिलीप  परदेशी जाण्यात  यशस्वी होतो ? का हे प्रत्यक्ष पहा. 

No comments:

Post a Comment