"जागतिक महिला दिना" निमित्त स्पृहा जोशी यांची कविता
तुम्ही मला शांत बसायला सांगता
मी 'माझं " मत मांडलं की
तुमच्या लेखी मी हटवादी होते
इतका वेळ हवीहवीशी वाटणारी माझी ऊब ,
नकोनकोशी धग बनून जाते !
ती फक्त तुम्हाला नको ,
म्हणून विझून कशी जाईल ?
फक्त तुम्हाला हवी म्हणून
जिभेवर साखर कशी पेरता येईल ?
मी "अशी " बनलेच नाहीये
तुम्ही गिळून टाकाल असा गोड मऊपणा,
नाहीये माझ्यात !
मी जड आहे , न पेलवणारी .
मी धारधार आहे , तलमही तितकीच .
म्हणूनच हाताळायला अवघड
नुसतेच अंदाज बांधणे बंद करा माझ्याबद्दल
मला विसरणं अवघड जाईल तुम्हाला;
आणि माझ्यावाचून जगणं ....
ते तर फारच अशक्य होईल.
No comments:
Post a Comment