Tuesday, 30 May 2017

तळलेले पापलेट


साहित्य - 
१) 2 मध्यम आकाराचे  पापलेट  (प्रत्येकी २ तुकडे केलेले  )
२)तिखट  (२ चमचा )
३)धना -जिरा पावडर   (१  )
४) गरम मसाला (१ चमचा )
५) आलं -लसूण पेस्ट  (१ चमचा  )
६)  हळद (अर्धा चमचा )
) जायफळ पावडर (१/४ चमचा )
८) लिंबू-रस  (२  १ चमचा  )
९)मीठ (चवीनुसार)
१०) तेल (४ चमचे )
११)  तांदळाचे पीठ ,थोडा तिखट मसाला, मीठ एकत्र केलेले


कृती -

१)  पापलेटचे  तुकडे स्वच्छ धुऊन  आलं -लसूण , जायफळ ,धना -जिरा पावडर ,तिखट , गरम मसाला , हळद ,लिंबू रस ,  मीठ ,  कोथिंबीर लावून १० मिनिटे ठेवा .
२)पापलेटच्या तुकड्यांना दोन्ही बाजूने तांदळाचे पीठ लावून घ्या . तेलात कडीपत्ता टाकून तेल गरम झाले की , माश्याचे तुकडे तळून घ्या . (तुकडे मोठे असल्यामुळे थोडावेळ झाकण ठेवा.  )
३) १० मिनिटापेक्षा जास्त वेळ शिजवू नका .
४) छोटे तुकडे केल्यास झाकण ठेवण्याची आवश्यकता नाही . 




,

No comments:

Post a Comment