Tuesday, 30 May 2017

कांदा-पोहे

               









साहित्य -

१)  पोहा  (१  बाउल  )
२)  कांदा  (१ बारीक चिरलेला )
३)  आलं -लसूण पेस्ट (१ चमचा )
४)  जिरा (१ चमचा )
५)   जायफळ पावडर ( १/४ चमचा, थोडीच घ्या उग्र आहे  )
६)   कडीपत्ता (१० पाने )
७)  पुदिना (१० पाने)
८)  तेल (२ चमचे )
९)   हळद ( अर्धा चमचा )
१०)   हिरव्या मिरच्या (२ बारीक चिरलेल्या )
११)   मीठ (चवीनुसार )
१२)  लिंबू (अर्धा )
१३) कोथिंबीर (पाव वाटी )
१४) मीठ (चवीनुसार )
१५)फरसाण  २ चमचे


कृती -

१)   तेलाला जिरा , कांदा , आलं -लसूण पेस्ट ,जायफळ  कडीपत्ता ,पुदिना , मिरची   याची फोडणी द्या . (कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत )
२)   भिजवलेले पोहे ,हळद , मीठ, लिबू  घालून मंद आचेवर झाकण ठेवून १० मिनिट शिजवा .
३)    कोथींबीर , फरसाण पेरून सर्व्ह करा .


टीप - 

१)  पोहे हाताला मऊ लागण्याइतपत भिजवा 
२)  डाळिंबाचे  दाणे किंवा अंजीर, सफरचंदाचे बारीक तुकडे  वरून पेरायचे  असल्यास फक्त कडीपत्ता ,  हळद ,मिठाच्या  फोडणीत पोहे करा . त्यात एक चमचा साखर टाका ) 





No comments:

Post a Comment