Tuesday, 30 May 2017

भारतीय पास्ता









साहित्य -

१)  पास्ता  (१ बाउल  )
२)  टोमॅटो  (१ मोठा प्युरी  )
३)  कोथिंबीर (पाव वाटी )
४) आला -लसूण पेस्ट  (१ चमचा )
५)  कांदा  (१)
६) एक -एक वाटी  भाज्या ( ढोबळी मिर्ची , गाजर )
७)  मॅगीमसाला -ए -मॅजिक    (१पाऊच )
८)  टोमॅटो केचप
८)   काळीमिरी पावडर  (अर्धा चमचा )
९)   पुदिना (१० पाने)
१०)चिली फ्लेक्स (१ चमचा )(चिली फ्लेक्स नसल्यास लाल मिरची बारीक कापा )
१०)  तेल (२ चमचे )
११)  मीठ (चवीनुसार )




कृती -

१)  पास्ता , मीठ घालून शिजवून घ्या (१ बाउल ) .  .
२)  दोन चमचे तेलावर  तेलावर आला-लसूण , एक कांदा बारीक कापलेला  ,पुदिना ,  चिली फ्लेक्स (१ चमचा ) , कांदा थोडावेळ (कांदा लाइट ब्राऊन होईपर्यंत ) परता . 
ढोबळी मिर्ची , गाजर घालून २ मिनिटे परता . 
)एका टोमॅटोची प्युरी, काळामिरी , मीठ घालून  पाच मिनिटे परतून घ्या 
५)  त्यानंतर  टोमॅटो केचप (१ चमचा )  व  शिजवलेला पास्ता  घालून मंद आचेवर पाच मिनिट शिजवा .
६) मॅगी मॅजिक मसाला सर्वात शेवटी घालून ३ मिनिटे परता .
७) कोथींबीर पेरून सर्व्ह करा .





                                                              मॅगी  मसाला -ए -मॅजिक

टीप - 

१)  पास्ता जास्त वेळ शिजवू नका . पॅकेटवर दिलेल्या कृतीप्रमाणेच शिजवा. नाहीतर कुकर मध्ये २ बाउल पाणी , थोडे मीठ , घालून फक्त एका शिटीवर शिजवून घ्या . 
२)   मूळ रेसिपीत टोमॅटो गरम पाण्यात ठेवून त्याची साल काढून प्युरी केली जाते . या रेसिपीत कच्च्या टोमॅटोची प्युरी केली आहे . 
मिक्स हर्ब , ओरेगॅनो  ने ही रंगत येईल 













         

No comments:

Post a Comment