एकटेपणा आपल्या मनातून येतो . ह्याच्याशी सामना करण्यासाठी स्पृहा -जोशी यांच्या सोप्या टिप्स
१) एकटं राहूच नका . आपल्या जवळ अशी माणसं पाहिजेत , असे मित्र पाहिजेत , अशी खास दोस्त मंडळी पाहिजेत , ज्यांना कधीही भेटून आपल्या मनातलं सगळं काही सांगता येईल . त्यावेळी दुःखच सांगायला पाहिजे असं नाही . कित्येकदा आपला आनंद सुद्धा शेअर करायची गरज असते . पण या सगळ्या गोष्टी शेअर करण्याला आपल्याला त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटायला पाहिजे . त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटा . त्यांच्याशी गप्पा मारा . तुमचा एकटेपणाही कुठच्याकुठे पळून जाईल .
२) खूप छान संगीत ऐका . म्युझिक आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या डिप्रेशन मधून बाहेर काढत . त्याचे खूप चांगले परिणाम आपल्यावर होत कित्येक शास्त्रज्ञांनी असं प्रूव्ह केलेलं आहे की , अगदी झाडापाशी तुम्ही छानसं म्युझिक लावून ठेवलंत तर ती झाडं जास्त वेगाने आणि छान वाढतात .आपण तर माणसं आहोत .
३) काहीतरी छान वाचा . पुस्तकांमधून छान गोष्टी आपल्याला कळतात . perspective जास्त मोठा होतो . कुठल्याही पद्धतीचं वाचन आपल्याला माणूस म्हणून grow करत असतं . खूप वाचत रहा
.
४) आपण इतक्या धकाधकीच्या आयुष्यात असतो , शहरी लाईफ -स्टाईल मध्ये असतो की , शांतपणा विसरून गेलेलो असतो . निसर्गाच्या जवळ जाण्याची गरज असते . छान ट्रिप्स प्लॅन करा . जास्तीत जास्त हिरवळ असेल , समुद्र असेल , छान नदी असेल अशा ठिकाणी जा आणि स्वतःला शोधायचा प्रयत्न करा .
५) virtual , technical गोष्टीपासून दूर रहा . technical , material गोष्टींपासून स्वतःला detach करा . फक्त आपल्या सोबत राहायचं .
याशिवाय माझ्या काही टिप्स
१) आवडणारे सिनेमे , नाटके पहा. life is beautiful , titanic , changing lanes, जिम केरीचे विनोदी चित्रपट , अमोल पालेकर -उत्पल दत्त चे विनोदी चित्रपट, चमेली कि शादी, टॉम आणि जेरी सही रे सही , सौजन्याची ऐशीतैशी , ती फुलराणी असे मनाला उभारी देणारे , ताज-तवांन करणारे चित्रपट, नाटक मुद्दाम पहा .
२) नृत्य करा . कुठल्याही प्रकारचं नृत्य शरीराला , मनाला खूप आनंद देत . वयाची अट नाही . तुम्हाला आवडत ते नृत्य करा. just express yourself.
"करावके" घ्या प्रोफेशनल असल्यासारखे गा . एकटेच गा . मित्र मंडळी , कुटुंबीय सोबत असतील तर अजून धमाल . एकटेपणा कुठच्याकुठे पळून जाईल .
३) तुमच्यातील एखादी सुप्त , कलात्मक गोष्ट आवर्जून करा . कदाचित तुमची हस्तकला , चित्रकला , पाककला चांगली असू शकते . त्यातून काहीतरी निर्माण करत राहा . स्वनिर्मितीचा आनंद काही वेगळाच असतो . अगदी कागदाची बोट बनवून पहा . तुमची कला नेट वर सादर करत असाल तर likes ची पर्वा करू नका . हे सर्व स्वतःसाठी आवर्जून करा . व्यक्त व्हा .स्वतःवर विश्वास ठेवा .काहीतरी सतत करत राहा . कदाचित काही गोष्टी अपूर्ण राहतील .आवडणार नाहीत . दुसरं काहीतरी सुरु करा . काहीतरी सतत करत राहणं , शोध घेत राहणं सोडू नका .
४) एखादा दिवस फक्त लोळत राहा . मन करेल तेव्हा उठा . आवडेल ते करा . थोडा वेळ स्वतःचा शोध घ्या . काहीच गवसलं नाही तर त्राण घेऊ नका . सरळ झोपून जा . आजचा, आताचा क्षण तुझा आहे . live it . Nobody can predict tomorrow . खूपच निराशा दाटून आली तर त्यातून निघण्याचा मार्ग काढा . पर्याय नक्कीच असेल . त्यामुळे प्रयत्न नक्की करा . उद्या तुमचाच असू शकतो .
५) एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने , फक्त असण्याने मनात खूप सकारात्मक भाव निर्माण होतात . ते कलाकार असू शकतात , मित्र असू शकतात , भूतकाळातील महान व्यक्ती असू शकतात . जरुरी नाही ते आपल्या आयुष्यात हवेत . Just feel good by their existence somewhere , that makes you feel so positive . be practical .
"लोपामुद्रा " हा स्पृहा जोशी यांचा कवितासंग्रह जरूर वाचा. आयुष्य जगण्याच्या सर्व टिप्स त्यात सापडतील . आयुष्यात कटू प्रसंग येत असतात . त्याने नाउमेद होऊ नका . तुमच्या आयुष्याचे गीत गात राहा . फोकस्ड रहा . स्पृहा जोशी यांच्या शब्दात ,
"कटू विखारी घाव जगाचे
मनात येता विरुनी जावे .
जगणे व्हावे इतके सुंदर
वेदनेतही गीत सुचावे "

No comments:
Post a Comment