साहित्य -
१) साधारण केळी (६ छोटी )
२) तांदूळ (१ वाटी )
३) तेजपत्ता (१)
४) जिरा (१ चमचा )
५) छोटी वेलची (४)
६) मोठी वेलची (१)
७) जायफळ पावडर ( १/४ चमचा, थोडीच घ्या उग्र आहे )
८) पुलाव मसाला (अर्धा चमचा )
९) कडीपत्ता (१० पाने )
१०) पुदिना (१० पाने)
११) तेल (२ चमचे )
१२) दालचिनी (१ तुकडा )
१३) काजू तुकडे (अर्धा )
१४) हळद ( अर्धा चमचा )
१५) मीठ (चवीनुसार )
१६) बदाम, मनुके (सजावटीकरिता )
कृती -
१) केळ्याची साल काढून छोट्या फोडी करा .
२) तेलाला जिरा , कडीपत्ता ,पुदिना , तेजपत्ता , वेलची , जायफळ याची फोडणी देऊन त्यात काजू १ मिनिटं परता . केळी फक्त दोन मिनिटे परता .
३) हळद , पुलाव मसाला टाकून फक्त एक मिनिट परता .
४) त्यावर एक पेला तांदूळ (कोलम ) टाकून २ मिनीट परता. त्यात दोन वाटी पाणी, चवीनुसार मीठ टाकून कुकरमध्ये फक्त एका शिटीवर शिजवा. कुकर २० मिनिटानंतर वेळानंतर उघडा .
५) बदाम -मनुके याने सजावट करा .
टीप -
१) तेलाऐवजी तूप वापरल्यास अजून लज्जत येईल .
२) कच्ची केळी वापरल्यास , फोडणीला वरील अ . क्र .२, ३ बरोबर १ चमचा आलं -लसूण पेस्ट , ३ मिरच्या (उभा छेद देऊन ) , कोथिंबीर घाला . (फणसाच्या बिया असल्यास साल काढून २ तुकडे करून अर्धा वाटी घाला )
No comments:
Post a Comment