Wednesday, 31 May 2017

मिसळ पाव



साहित्य -

१) कडधान्य ( १ छोटे बाउल )

फोडणी-साहित्य  


१)   आलं -लसूण पेस्ट (१ चमचा )
२)  कांदा ( अर्धा बारीक चिरलेला)
२)   टोमॅटो (१ बारीक )चिरलेला )
३)  कडीपत्ता (१० पाने )
४) मिरच्या (२ उभे छेद देऊन )
५) तिखट मसाला  (२ चमचे  ) 
६) हळद (अर्धा  चमचा )
७) तेल तीन चमचे 

रस्सा मसाला-साहित्य  

१) १ कांदा ( उभा चिरून )
२)  सुके खोबरे किसलेले  ( १ वाटी )
३)  लाल मिरच्या (२ )
४) धणे (१ चमचा )
५)काळीमिरी (१०)
६) दालचिनी (१ तुकडा )
७) जायफळ ( छोटा तुकडा )
६)जिरा (१ चमचा )

सजावटीसाठी व वरून पेरण्यासाठी 

१)कोथिंबीर (२ वाटी बारीक चिरलेली )
२)फरसाण एक वाटी 
३) लिंबू 


कृती 

१) प्रथम कडधान्य हळद , मीठ , पाणी टाकून ३ शिट्यांवर शिजवून घ्या 
२) रश्श्याचे साहित्य  तव्यावर भाजून त्याची मिक्सर मध्ये पेस्ट तयार करा . 
३) फोडणीच्या साहित्याला तेलात ५ मिनिटे व्यवस्थित परता . 
४) त्यात रस्सा मसाला टाकून थोडावेळ परतून आवश्यकतेनुसार पाणी टाका . एक उकळी आली की , शिजवलेले मूग टाकून ५ मिनिटे शिजवा . (कडधान्यात मीठ असल्यामुळे आवश्यक असेल तरच थोडे मीठ टाका )  
५) कोथींबीर टाकून सर्व्ह करताना थोडे फरसाण , त्यावर रस्सा , त्यावर पुन्हा फरसाण , बारीक कापलेला कांदा पेरा . थोडा लिंबू रस टाका . 

टीप 

१)  कडधान्याऐवजी सफेद वाटाणेही  छान लागतात . 


No comments:

Post a Comment