Monday, 5 June 2017

आश्वस्त करतं असणं




तुझं दूर असणं जीवघेणं 
नको अस्वस्थ हे जगणं
चालेल मज  अबोला 
आश्वस्त करतं  असणं 

सरेना क्षण एकला 
शून्य माझं जगणं
दे त्यास पूर्णत्व 
आश्वस्त करतं  असणं 

पावसात न भिजता 
नयनांचं  अवचित भिजणं
भिजुनी कोरडं  राहणं . 
आश्वस्त करतं  असणं 

तुझं भांडणं  ,तुझं रुसणं
स्वतःतच जरी रमणं
लाभे सहवास सुखदायी 
आश्वस्त करतं असणं 

लाख ताऱ्यांची सोबत
पोकळी एक भयाण 
त्याला नाही नजाकत
आश्वस्त करतं तुझं असणं 


No comments:

Post a Comment