माणसं येतात सुख ओरबाडायला
उरल त्यातून थोडं तर शिंताडायला
त्यांचा स्वार्थ दिसत असतो आरपार
तरीही हतबल करते जीवनाची धार
देवाच्या नावाने जागरण करणाऱ्या
मधाळ शब्दांचं जाळं विणणाऱ्या
देवाला गोंजारणाऱ्या अवगत असते ,
देव आणि व्यवहार यातली सीमारेषा
त्यांना माहित असतं कुठं थांबायचं
देवाच्या आडून स्वार्थ साधायचं
त्यांना नेमकं ठाऊक असतं
साध्या मनांना गुलाम करायचं
तुम्ही फक्त बघता त्यांचा दिखाऊ देव
धावता वारी आंधळ्यासारखी ...
सांडून शिक्षणाची पंढरी
गुंतता देवात ..... जरी संत म्हणती देव माणसात
उरल त्यातून थोडं तर शिंताडायला
त्यांचा स्वार्थ दिसत असतो आरपार
तरीही हतबल करते जीवनाची धार
देवाच्या नावाने जागरण करणाऱ्या
मधाळ शब्दांचं जाळं विणणाऱ्या
देवाला गोंजारणाऱ्या अवगत असते ,
देव आणि व्यवहार यातली सीमारेषा
त्यांना माहित असतं कुठं थांबायचं
देवाच्या आडून स्वार्थ साधायचं
त्यांना नेमकं ठाऊक असतं
साध्या मनांना गुलाम करायचं
तुम्ही फक्त बघता त्यांचा दिखाऊ देव
धावता वारी आंधळ्यासारखी ...
सांडून शिक्षणाची पंढरी
गुंतता देवात ..... जरी संत म्हणती देव माणसात
No comments:
Post a Comment