Tuesday, 23 May 2017

फ्राईड चिकन




साहित्य - 
१) बोनलेस शिजवलेले चिकन (१ छोटे  बाउल )
२)काळामिरी पावडर (१ चमचा )
३)कांदा (१ मध्यम तुकडे )
४) लसूण (३ पाकळ्या क्रश केलेली )
५)मीठ (चवीनुसार)
६) तेल (३ चमचे )
७)कांदा (१ मध्यम तुकडे )
८)सिमला मिरची (१ छोटे तुकडे करून )
९) काळामिरी पावडर (१ चमचा )
१०)पेपरीका (१ चमचा) किंवा एका लाल मिरचीचे बारीक तुकडे , १ हिरवी मिर्ची (उभा छेद देऊन )
१०)सोया सॉस (१ चमचा )
११)मिक्स हर्ब्स (अर्धा चमचा )

कृती -

१)  बोनलेस शिजवलेल्या चिकनला मीठ व काळीमिरी पावडर लावून तेलावर परता .
२) चिकनचे तुकडे बाहेर काढून त्याच तेलात कांदा मोठ्या आचेवर परतून त्यात, लसूण , हिरवी मिरची थोडावेळ परता (३ मिनिटे ) ,
३) त्यात सिमला मिर्च थोडावेळ परता .  त्यावर काळामिरी पावडर , पेपरिका, मिक्स हर्ब्स , सोया सॉस  टाकून साधारण ३ मिनिटे परता   .
४)  तेलात परतलेल्या चिकनचे तुकडे टाकून व्यवस्थित मिश्रण करा .

(हा चायनिस प्रकार असल्याने सर्व मोठ्या आचेवर करा तसेच पदार्थ सतत ढवळत रहा.  )


टिप - 
१)  बऱ्याच  घरात चिकनच्या रश्श्यातील तुकडे खाल्ले जात नाहीत . (विशेषतः लहान मुले ) रश्श्यातील शिजलेले काही तुकडे आधीच बाहेर काढून  स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांना मीठ , काळीमिरी लावून तेलात परतावेत . (वरील कृतीत मी अशाच शिजवलेल्या चिकनचा वापर केला आहे )
२)घट्टपणा येण्यासाठी आवडत असल्यास १ चमचा  पीठात थोडे पाणी घालून ते शेवटी मिश्रणात टाकून थोडावेळ परतावे . 
३) चिकनला मीठ लावलेले असल्यामुळे आवश्यक असल्यासच मीठ टाका .
४)मिक्स हर्ब्स  नसल्यास जिरा भाजून त्याची पावडर अर्धा चमचा टाका .





,

No comments:

Post a Comment