व्हाट्स अँपवर खालील छायाचित्रफीत- संदेश माझ्या भ्रमणध्वनी वर आला .
" पियुष मिश्रा यांच्या "जब शहर हमारा सोता है" या मूळ नाटकावर आधारीत "ह्या साल्या एनर्जी चं कराचं काय ?" हे प्रायोगिक नाटक पद्मनाभ बिंड यांनी दिग्दर्शित केलंय .आमची मैत्रीण स्नेहा माजगावकर त्यात काम करतेय . येत्या १३ डिसेंबर रोजी या नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिर येथे होणार आहे . ज्यांनी हे नाटक बघितलं नसेल त्यांनी आवर्जून या नाटकाला जा . खूप अमेजिंग नाटक आहे . सर्वांनी खूप मेहनत घेतलीय . "
स्पृहा जोशी त्यात सर्वांना नाटक बघण्याची लाडीक गळ घालतायंत . मग नाटक बघणं भागच होतं .

जब शहर हमारा सोता है " या नाटकाचा मग मागोवा घेतला . या नाटकात १३ गाणी आहेत . खरतर तर ते सांगितीक नाटक , "वेस्ट साईड स्टोरी "वर बेतलेलं . अन मजा म्हणजे "वेस्ट साईड स्टोरी " शेकस्पिअर च्या "रोमिओ , ज्युलिएट " वर आधारीत सांगितीक शोकांतिका .त्यावर त्याच नावाचा सिनेमा आला त्याला दहा ऑस्कर पारितोषिके मिळाली . कथेचा सारांश शेकस्पिअर च्या काळापासून तोच आहे. काल प्रवाहात कथेला सध्याचे संदर्भ प्राप्त झाले आहेत . तसा "जब शहर हमारा सोता है " ला भारतीय पाश्वर्भूमी चा साज चढविण्यात आला . इथल्या धगधगत्या घटनांची गुंफण करून वस्तुस्थितीदर्शक नाट्य निर्माण झाले ते म्हणजे पियुष शर्मा यांचे "जब शहर हमारा सोता है " त्यातील ;खालील ओळी कथेची दाहकता दर्शवितात , अस्वस्थ करतात .
जब शहर हमारा सोता है तो है तो मालूम तुमको हां क्या होता है
इधर जागती है लाशे जिंदा हो मुर्दा उधर जिंदगी खोता है
इधर चीखती इक हव्वा खैराती उस अस्पताल में बिफरी सी
हाथ में उसके अगले ही पल गरम मांस का नरम लोथडा होता है
"जब शहर हमारा सोता है " चं मराठी रुपडं घेऊन व्हराडी , हिंदी भाषेत आलं आहे . ""ह्या साल्या एनर्जी चं करायचं काय ?" हे शीर्षक खूप समर्पक आहे. सद्गुरू म्हणतात तसे, आपली संस्कृती ही नवनवीन सामावून घेणारी, नित्य नवे शोधू पाहणारी (seeker ) आहे. परंतु , आपण जेव्हा एका विशिष्ट विश्वासात अडकले जातो तेव्हा संस्कृतीची वाढ खुंटते. विश्वास सकारात्मक, योग्य मार्गाकडे नेणारा असेल तर ठीक, त्याची ऊर्जा प्रचंड आहे . नाहीतर मोठा अनर्थ घडू शकतो . एखाद्या विशिष्ट समुदायाबद्दल असलेली पक्की धारणा, त्यातून निर्माण झालेली नकारात्मकता . त्या समुदायाच्या मनात त्यातून निर्माण झालेला असंतोष . अन दोन्ही समुदायाचा आपापल्या धारणांवर असलेला पक्का विश्वास याचा तिढा सुटता सुटत नाही. पिळ वाढत जातो. इतका की , ताण असह्य होतो. उरतो तो एक भयानक विध्वंस. एक भयाण शांतता ...
नाटकाची सुरुवात बंजारा गाण्यांच्या माध्यमातून होते. कथाबीज हळूहळू उलगडत जातं. गावपातळीवर, छोट्या शहरात बाजार हे एक विरुंगळ्याचं , दोन क्षण मन रमवायचं हक्काचं ठिकाण . आपल्यासाठी जस मॉल असतं तसं. परंतु , इथेच दोन समुदायाच्या असंतोषाची ठिणगी पेटते आणि नियतीचा संकेत म्हणा किंवा त्यापलीकडीलं काही , त्याच ठिणगीतून एक प्रेमकथा आकाराला येत असते,आभास आणि तराना यांची . खरतर प्रेम म्हणजे , "marriage of true minds ", त्याला धर्म , जात , पंथ याचं काय ? अशा संकल्पनात आपल्यासारखी "शहाणी " माणसं कायम गुरफटलेली असतात . तराना अस्लमची बहीण . तिचं प्रेम जडत आभासवर . आभास म्हणजे अस्लमच्या विरोधक समुदायाचा . अस्लमचं प्रेम असतं तबस्सूमवर . सगळे वर वर आनंदी दिसत असले तरी आतून अस्वस्थ आहेत . खरंतर सगळ्यांनाच हे नको असतं . परंतु कधी कधी समाजाबरोबर भरकटत जाव लागतं , इच्छा नसूनही . आभास , तराना, तबस्सूम यांना हे सर्व नकोय . त्यांना या सर्वांपासून दूर जायचंय . ते स्वप्न रंगवतायत छोट्या घरट्याचं , विहरतायत त्या स्वप्नात . त्या स्वप्नाला गालबोट लागतं , जेव्हा आभासचा मित्र एका तंट्यात अस्लमकडून मारला जातो . मग दुःखद घटनांची एक मालिका सुरु होते . अस्लम आभासकडून अनावधानाने मारला जातो . तबस्सूम आभासला तराना मारली गेल्याचं सांगते, परंतु नंतर ती आभासच्या मदतीला येते , हे सर्व ती सूडापोटी करते काय ? मग ती मदतीला का येते ? तराना , आभासचं पुढे काय होत ? या सर्वांचा शेवट काय होतो ? या सर्वांची उत्तर मिळविण्यासाठी नाटक पाहावं लागेल .
तबस्सूम जेव्हा आभासला मदत करायला येते तेव्हा सूडाची पट्टी डोळ्यावर चढवलेले लांडगे तिच्यावर तुटून पडतात . अशावेळी एक स्त्रीचं तिच्या मदतीला येते , दुसऱ्या समुदायाची असूनही . कारण एका स्त्रीच्या आत्मसन्मानाची भावना तिच्याहून दुसऱ्या कुणाच्या हृदयाला स्पर्श करणं कसं शक्य आहे . तबस्सूमची घालमेल , दुःख , व्यथा या छटा इतक्या ठळकपणे समोर येतात की , तिची व्यथा आपली बनून जाते . प्रेमात आकंठ बुडालेली तबस्सूम , आजूबाजूच्या वातावरणामुळे अस्वस्थ असलेली तबस्सूम , अस्लमला समजावताना अगतिक झालेली तबस्सूम , एका फसव्या क्षणामुळे सुडाने पेटलेली तबस्सूम , त्यातून सावरताना आभासला मदत करू पाहणारी तबस्सूम, तिच्यावर अनावस्था प्रसंग ओढावतो तेव्हा सुन्न झालेली तबस्सूम.... विविध छटा ... त्याचे नाजूक पदर स्नेहा माजगावकर यांनी इतक्या खोलपणे उलगडले आहेत. की , ते नाट्य न वाटता आपण समरस होऊन जातो .
आभास , तराना यांचा प्रेमात आकंठ बुडालेल्या अभिनयात जराही कृत्रिमता नाही . ते खरंखुरं प्रेमी युगल वाटतं . इतक्या तन्मयतेने त्यांनी भूमिकेत गहिरे रंग भरले आहेत . तरानाने अवखळ मुलगी ते हतबल प्रेमिका हा प्रवास संयतपणे आणि प्रगल्भपणे साकारला आहे . सर्वच कलाकारांनी अपार मेहनत घेतली आहे. या नाटकात अनेक वेगवान हालचाली आहेत . त्यासाठी अखंड ऊर्जा लागते. सर्व कलाकारांनी ती ऊर्जा शेवटपर्यंत टिकवून ठेवली आहे .
चहाची टपरी , केवळ बंजारांच्या प्रवेशातून दाखविलेला मीनाबाजार , आपल्या प्रियकराशी गॅलरीतून गुंजारव करणारी तराना ... ती गॅलरी . नेपथ्यासाठी मोजक्या वस्तूंचा सफाईने केलेला वापर आणि प्रसंगांना पूरक प्रकाशयोजना ,संगीत, देशातलं गल्लीत आणि गल्लीतलं देशात या पलीकडं काय होत ?अश्या वाक्यातून समाजाची नेमकी परिस्थिती डोळ्यासमोर ठेवणारे संवाद . कुर्त्याचा गळा एक इंच खाली ठेवल्याने काय होतं , या तरानाच्या भाबड्या प्रश्नाला तबस्सुमनं दिलेलं उत्तर , "बहोत कुछ हो सकता है " , तसेच, परिस्थिती पूरक इतर संवाद , या सर्व पूरक गोष्टीची गुंफण दिग्दर्शकाने सफाईने करून जे नाट्य निर्माण केले आहे , त्याने नाटकातली प्रत्येक चौकट जिवंत झाली आहे . सर्व कलाकारांच्या मेहेनतीतून एक संमोहित करणारी कलाकृती तयार झाली आहे . स्पृहा जोशी यांनी उगीच नाही म्हटलं , " खूप अमेजिंग नाटक आहे !". हा नाट्यानुभव जरूर घ्या . चुकवू नका .

वाचल्यावर पाहावसं वाटतं नाटक
ReplyDelete