हे पाखरांनो ...उंडरत गगनी
माळ तुमची विहरती कुठे ?
ऐकाल जरा का क्षणभर माझे ....
मला न उमजे ....
तिथे पलिकडे डोंगराआड एकटी
प्रिया माझी का अलिप्त असे ....
सांगाल तिला जरा का
मनवाल तिला जरा का ....
फुले न हसती ... पाने न नाचती
वाराही गोंडा घालीत नसे
ये परतुनी या घरकुली
तुजविन या भिंतींना चैतन्य नसे ....
No comments:
Post a Comment