धुक्यात रम्य माझी वाट
शाल पांघरून, कोवळी पहाट
झाडे झाली सुस्त आणिक ...
पाखरांची किलबिलाट हृदयात ...
किलबिलती ते माझेच गाणे
हसती अवखळ अन म्हणती
धुक्यात काय ते नयन शोधती
सांगावे का तिस हृदयाचे म्हणणे
अवचित धुक्यातून तिने यावे
धुक्यातही तांबडे फुटावे ....
शब्दांचे मग मज काय घेणे
घट्ट बिलगावे अन धुके व्हावे .
शाल पांघरून, कोवळी पहाट
झाडे झाली सुस्त आणिक ...
पाखरांची किलबिलाट हृदयात ...
किलबिलती ते माझेच गाणे
हसती अवखळ अन म्हणती
धुक्यात काय ते नयन शोधती
सांगावे का तिस हृदयाचे म्हणणे
अवचित धुक्यातून तिने यावे
धुक्यातही तांबडे फुटावे ....
शब्दांचे मग मज काय घेणे
घट्ट बिलगावे अन धुके व्हावे .
No comments:
Post a Comment