आणि, मी ठरवतो तुला स्मृतिआड करायचं,
मन दगडासारखं करून मुक्त वाहायचं,
पाझरतं तरीही पाणी कोन्यातून नकळत ....
आणि कधी वाटतं पावसात चिंब व्हायचं
तुझ्यासवे पावसाला अंतरंगात रुजवायचं
का तरीही निसटतात दवबिंदू मिठीतून नकळत
आणि कधी मग ठरवतो तुझं लक्ष वेधायचं,
बर्फासारख्या अलिप्ततेला तुझ्या भेदायचं
हतबल मनातून मग वाहतं पाणी नकळत...
आणि कधी वाटतं कोमल त्या क्षणांना वेचायचं,
हळूच ओंजळीत तुझ्या त्यांना सोपवायचं
विरघळतात क्षणच ते अश्रू होऊन नकळत
आणि किती तुझंच गीत मी आळवायचं ..
मृगजळाच्या मागे किती मी धावायचं ..
एक आशा तरीही ओघळते डोळ्यातून नकळत....
No comments:
Post a Comment