तुम्ही ज्या उंचीवर आहात ..
त्या प्रतलावर नाही सामावू शकत सामान्यजन ...
म्हणून तो पाहत असतो प्रतिबिंब ...
कधी डोळ्यातील काळ्या वर्तुळात ....
तर कधी मोहवणाऱ्या काजळात ...
रंगवत असतो स्वप्न .... उधारीच्या अवकाशात ...
तुम्हाला काय वाटलं .... त्याचा नाही वेगळा परीघ ...
त्याची नाहीत वेगळी स्वप्न ...
केवळ त्या स्वप्नांना नाही मुठीत घेऊ शकत ...
म्हणून केवळ शब्दच आहेत ओंजळीत ...
कधी अतिरेकी कौतुक वाटणारे ...
तर कधी जास्त आगळीक साधणारे ...
आणि कधी स्वतःला प्रतिबिंबात पाहत काळजी वाहणारे ...
या शब्दांनीच लाभली आहे उंची ..
आणि या शब्दांनीच आहे प्रतिभा आकारली ...
या शब्दांनीच कधी बहरली आहे ती फुलराणी ...
या शब्दांनीच दिलाय आसरा ,
त्या उंचीला नाही कवेत सामावू शकणार हे उमजून ,
या शूद्र कणांना ....
नका हो तोडू या शब्दांना ....
आणि त्यामागील निष्पाप भावनांना ...

No comments:
Post a Comment