बाळ झोपत तसं रात्री झाड झोपतं , अशी म्हातारी म्हणायची...
माणसासारखीच पानाफुलांना जपायची.....
तुम्हाला एक गुपित सांगतो..
tree gives oxygen ,म्हणजे झाडे प्राणवायू देतात..
म्हातारीला झाड म्हणजे बाळ हेच ठावुक...
पण तुम्हाला इंग्लिशच पटकन कळत म्हणून थोडं झाडलं..
आता ती म्हातारी राहिली नाही...
आणि तिला माणसासारखी वाटणारी झाड सूध्दा..
बघा तुम्हाला पटलं तर..
झाडसुध्दा माणूस वाटलं तर..
नाही वाटलं तर काही नाही ..
त्या झाडाच काही म्हणण नाही ..
ते उगवेल तुम्ही पेरल तर..
ते मरेल तुम्ही तोडल तर ..
आणि कशाला हवी सावली..
तुम्ही शाणी माणस चार बुकं शिकलेली ..
म्हणाल एसी आहे की...
म्हणाल विकास आहे की...
येडीच आहे हो म्हातारी..
मग ठिक ठरलं तर ...
द्या टाकून ते म्हातारीचं येडेपण .,
निदान
झाड म्हणजे प्राणवायू हे पटत नाही...
श्वास अवरोधीत होत नाहीत तोपर्यंत थोडं थांबू आणि पाहू...
खरोखरचं बाळ रडले तर...खरोखरचं श्वास उरले तर...
अजय भोसले
No comments:
Post a Comment